publiccontact.in

Nasbandi Karyashala:आंतरराष्ट्रीय नशाबंदी दिवसानिमित्त बुलढाणा पोलीस दल यांच्यातर्फे नशाबंदी कार्यशाळा

 


 naśābandī kāryaśāḷā

खामगाव, (का. प्र.) : 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय नशाबंदी दिवसानिमित्त बुलढाणा पोलीस दल यांच्यातर्फे नशाबंदी कार्यशाळा गुंजकर एज्युकेशन हब मध्ये घेण्यात आली.
आजच्या दिनी समाजामध्ये गाव पातळीवर शहरांमध्ये जे लोक नशेच्या आहारी गेले आहेत जे नशेचे गुलाम झाले आहेत, त्यांना नशा मुक्त होण्यासाठी तसेच भावी पिढी नशा मुक्त व्हावी यासाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार माननीय श्री रामकृष्ण पवार साहेब यांनी यावेळी मौलिक असे मार्गदर्शन केले आहे. समाजामध्ये व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे या व्यसनामुळे तरुण पिढी ही भरकटत असून ती दिशाहीन होत आहे.

naśābandī kāryaśāḷā
आज रोजी सर्वात मोठी समस्या ही व्यसनाधीन युवा पिढीची होत चालली आहे ती थांबली पाहिजे त्याला आळा बसला पाहिजेत. देशाची समाजाची चांगली युवा पिढी निर्माण झाली पाहिजे असे मौलिक मार्गदर्शन मा ठाणेदार पवार साहेबांनी याप्रसंगी केले. तर नेहमीच अधिकांश वादविवाद भांडण व गुन्हेगारी जी वाढत चालली आहे त्याला सुद्धा व्यसनाचे खूप मोठे कारण आम्हाला नेहमीच पाहायला अनुभवायला येत असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की व्यसनमुक्त व्हावी, चांगली शरीर संपन्न असावे, चांगले विचार आचार असावे, परिवाराची तसेच समाजाची जबाबदारी प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे व व्यसनापासून पासून दूर राहिले पाहिजे असे सांगितले. तसेच विधीतज्ञ अ‍ॅडवोकेट आशा भागवत यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. सरते शेवटी अध्यक्ष भाषणामध्ये गुंजकर एज्युकेशन हब चे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर यांनी सुद्धा सध्याची जी युवा पिढी व्यसनाधीन कडे कशी वळतआहे याबद्दल वेगवेगळे दाखले सांगून त्यांनी यापासून कसे दूर राहावे विशेष करून मोबाईल चा वापर कसा कमी करावा मोबाईल कसा टाळावा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. शेवटी गुंजकर एज्युकेशन हब च्या वतीने ठाणेदार पवार साहेब आणि अ‍ॅडवोकेट आशा भागवत मॅडम यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला गुंजकर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सतीशजी रायबोले सर, कॉलेजचे प्रा गजानन विरघट, प्रा इरफान खान सर, प्रा दीपक भराड सर, प्रा काळे सर, प्रा विनीत भाटिया सर, प्रा राजकुमार राठी, प्रा माधुरी जाधव मॅडम, अविनाश ठाकरे सर, अंजली मॅडम, दामू मिसाळ, नितीन पाटील व गुंंजकर एज्युकेशन हबचे कर्मचारी व विद्यार्थीवर्ग यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top