
खामगाव (प्रतिनिधी):स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगांव व्दारा संचालीत गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगांव येथे आंतरराष्ट्रीय ऑलम्पीक दिना निमित्त बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन इनडोयर हॉल येथे करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे क्रिडा व शारिरीक शिक्षण संचालक डॉ. अनुराग बोबडे यांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर अध्यक्षीय स्थानी होते. गोसे महाविद्यालय इंदोर हॉलची समन्वयक डॉ. एस.टी.वराडे व डॉ. एस. ए. भोसले, सदस्य बॅडमिंटन असोसिएशन बुलढाणा, डॉ. खंडारे, श्री. पुरुषोत्तम आखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पधेमध्ये एकूण 35 स्पर्धकानी सहभाग घेतला असून -15 वयोगटात विजेता-प्रथम मोटनानी, उपविजेता हर्षल वेग हा होता, तसेच -17 वयोगटात विजेता – अभिषेक देशमूख, उपविजेता अथर्व आखरे, महिला एकेरी स्पर्धेत विजेती- ओजश्री खंडारे, उपविजेती- श्रावणी इंगळे, पुरुष खुला वर्ग एकेरी स्पर्धेत विजेता परिक्षीत आमले व उपविजेता वेदांत उमरकर हे ठरले असून सर्व विजेतांना माननीय उपस्थितांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रोख पारितोषीक देण्यात आली.यांना अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी विविध खेळ तसेच बॅडमिंटन चे महत्व पटवून दिले व सर्वानी कमीत कमी एक खेळ नियमीत खेळावा असे आव्हान केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री. पवन वनारे प्रशिक्षण G.S. Badminton Academy यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वेदांत उमरकार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. एच. ए. भोसले यांनी मानले. आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनानिमित्त बॅडमिंटन स्पर्धेकरीता महाविद्यालयतील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.

